Ticker

6/recent/ticker-posts

कॅप्टन जोशी विद्यालयात फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ संपन्न; प्रयोगांतून उलगडले विज्ञानाचे विश्व.



येणेगुर प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी 

आज दिनांक 27/02/2026 रोजी पुण्यातील प्रसिद्ध प्रवीण मसाले वाले सुहाना मसाला आणि ज्ञान प्रबोधिनी, हराळी (धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने येणेगुर येथील कॅप्टन जोशी विद्यालयात 'फिरती विज्ञान प्रयोगशाळा' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध क्लिष्ट संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगा द्वारे अनुभवल्या.

विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी पुढाकार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि पाठ्यपुस्तकातील प्रयोग त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळावेत, यासाठी सुहाना मसाल्याच्या सामाजिक उत्तरदायित्व C S R निधीतून आणि ज्ञान प्रबोधिनीच्या तांत्रिक मार्गदर्शनातून हा 'सायन्स ऑन व्हील्स' प्रकल्प राबवला जात आहे.

प्रयोगांचे थेट सादरीकरण

या फिरत्या प्रयोगशाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीव शास्त्र. शी संबंधित अनेक उपकरणे उपलब्ध होती. हवेचा दाब, प्रकाशाचे अप वर्तन, मानवी शरीरातील इंद्रिये आणि रासायनिक अभिक्रिया चे थेट प्रात्यक्षिक ज्ञान प्रबोधिनीच्या तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी न विद्यार्थ्यांना करून दाखवले. व तसेच शाळेचे विज्ञान विभाग प्रमुख कोमल कीर्तने मॅडम, प्रवीण स्वामी गुरुजी ,महेश गुरुजी, यांनी सांगितले की केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी स्वतः काही प्रयोग करून पाहिल्याने त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. 

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, श्री महेश हरके गुरुजी व देवराज बिराजदार गुरुजी, शंकर हुळमजगे गुरुजी, चंद्रकांत बिराजदार गुरुजी,अविनाश दुणगे गुरुजी,शिक्षक वृंद आणि सुहाना मसाले व ज्ञान प्रबोधिनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. "अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांच्यात संशोधक वृत्ती जागृत होण्यास मदत होईल," असे मत यावेळी विद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आले. 

या उपक्रमाबद्दल शाळेचे संस्था अध्यक्ष व तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थांनी सुहाना मसाले आणि ज्ञान प्रबोधिनीचे विशेष आभार मानले आहेत.