सतीश पांडे ( कळमेश्वर प्रतिनिधी)
कळमेश्वर :– माणसाच्या जीवनात विविध रंग भरणारा दिवस. निसर्गाने विखुरलेल्या रंगा मुळेच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. रंगाची उधळण करणारा, जीवनाच्या रंगात रंग मिसळणारा हा : होळी दिवस... कोणाचेही जीवन बेरंगी न करता साजरा व्हावा.
होळी तसा दोन दिवसांचा सण. पूर्वी ग्रामीण भागात गोवऱ्या, लाकडे गोळी करून होळी पेटवली जायची. होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. विचू, पाल, ढेकूण सारखे विषारी जीव कणकीचे बनवून होळीत दहन केले जात. आजही काही भागात ही प्रथा आहे. खरे तर सर्व वाईट गोष्टी सोडण्याचा हा दिवस. परतु नेमक्या याच दिवशी अनेक वाईट गोष्टी पहावयास मिळतात.
होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन. पूर्वी होलिका दहनानंतरची राख अंगाला लावून धुळवड साजरी केली जायची. कालातराने त्यात बदल होत गेला. आज विविध रासायनयुक्त रंगांचा वापर केला जातो. त्यांचा त्वचेवर, डोळ्यांवर तसेच केसांवर विपरीत परिणाम होत असतो. रंग लावल्यावर कोणालाही इजा होवू नये. अशा नैसर्गिक रंगांचा शक्यतो वापर करायला हवा. पळस फुलांपासून केशरी रंग, बीट फळभाजीपासून लाल रंग तयार करता येतो. हळदीपासून पिवळा रंग, अष्टगंथ वापरूनकेशरी रंग तयार करता येईल. वावडिंगाच्या बियांपासून आपणास जांभळा रंग तयार करता येतो.
धुळवडीला अनेक तरुण मद्यप्राशन करतात. तीन-चारजण मोटारसायकलवर भरधाव वाहन चालवतात. यामुळे धोका होतो. रसायनयुक्त रंगांचा वापर करतात. हे जीवावर बेतणारे आहे. आनंदाचाहा दिवस आनंदाने साजरा करावा. दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे रंग भरले जाईल, ही दृष्टी ठेवून साजरा करावा. होळीमुळेहोऊउडू नयेत कुणाच्या जीवनाचे रंग 'नऊ रंगाची ही होळी होवो आनंदे साजरी प्रियजन प्रत्येकाचा सुखरूप येवो घरी'





Social Plugin