CTE प्रकल्प हिंगोली येथील वसमत मॉडेल अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सुपरवायझर यांचा प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजय बोराटे सर(म बा क) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. आपल्या क्वेस्ट च्या वतीने सह संचालक श्री नितिन विशे सर यांनी QUEST संस्था,पालवी कार्यक्रमाचे उद्धीष्ट व स्वरूप सांगतीले.
या सन्मान सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी तसेच ICDS प्रकल्प वसमत येथील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
CTE प्रकल्प हिंगोली चे सचिन चिंचोलकर आणि ICDS प्रकल्प वसमत च्या पर्यवेक्षिका प्राजक्ता रणेर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर महिला बाल विकास अधिकारी प्रिया लखमोड यांनी प्रास्ताविक मांडले श्री विजय बोराटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म बा क यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना प्रेरणापूर्वक काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. एकूणच कार्यक्रम चांगला झाला अश्या प्रतिक्रिया उपस्थितांकडून मिळाल्या. भविष्यात अश्या सन्मान सोहळ्यात 16 ऐवजी 100 सेवकांचा सन्मान करायला मला आवडेल अशी ईच्छा मा.विजय बोराटे यांनी व्यक्त केली.
हा सन्मान सोहळा यशस्वी होण्यासाठी चुकेवार सर वाळवंटे सर मनोज सर राजेंद्र मोरे सुनील शनवारे दामिनी इंगळे अंगणवाडी सेविका आणि इतरांचे खूप महत्वाचे योगदान लाभले.शेवटी CTE प्रकल्प व्यवस्थापक नितीन मराडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.





Social Plugin