ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे हिंदू-मुस्लिम धर्मात एकतेच दर्शन घडले आहे. मुस्लिम धर्माच्या पवित्र 'रमजान ईद' अर्थात 'ईद-ऊल-फिञ' सणाच्या दिवशी व गावात सुरू असलेल्या १८ व्या सर्वधर्मीय अखंड शिवनाम व शिवमहापुरान कथा सप्ताहात येथील दिवंगत पैलवान पिरसाब मदार यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी फक्रूशा पिरसाब मदार,कार्यालयीन बँक सहाय्यक महमदरफी फक्रूशा मदार,कवी,गीतकार,पञकार जाफर फक्रूशा आदमपूरकर या मुस्लिम बांधवांनी धार्मिक एकोपा जपत सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी २१ मार्च रोजी सायंकाळी महाप्रसाद वाटप करून हिंदू-मुस्लिम धर्म एकतेचे दर्शन घडवून आणले आहे.
आदमपूर ग्राम येथे मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवनाम सप्ताह व शिवकथा हा धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सात दिवस चालणाऱ्या सप्ताह्यात दररोज गावातील सद्भभक्त दानशूर व्यक्तींकडून महाप्रसादाचे वाटप केले जाते.त्याच अनुषंगाने येथील सर्वधर्मसमभावी मुस्लिम बांधव महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जेष्ठ व्यक्तिमत्त्व सेवानिवृत्त कर्मचारी फक्रूशा मदार व बँक सहाय्यक महमदरफी मदार, जाफर आदमपूरकर यांनी दुपारी २ ते ५ दरम्यान शिवकथा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भाविक व गावकऱ्यांसाठी महाप्रसाद वाटप केले आहे.त्यांनी केलेल्या या महाप्रसादाच्या वाटपामुळे आदमपूर, थडीसावळी,गळेगांव परिसरासह संपूर्ण तालुक्यातून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले असल्याचे बोलके चित्र गावपरिसरात पाहण्यास मिळाले.हा गावातील धार्मिक एकोपा कायम राहील हीच निखळ
चर्चा जनमानसात लोकप्रिय झाली.





Social Plugin