Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.उमेश कुऱ्हाडे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

 


 गुणवंत राठोड प्रतिनिधी कारंजा लाड 

 श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. उमेश कुऱ्हाडे यांना 99 व्या महाड क्रांति दिनाच्या  पर्वावर महाड येथे बुद्धिस्ट नेटवर्क सामाजिक व शैक्षणिक संस्था कळंबोली पनवेल जिल्हा रायगड यांच्या वतीने  दि. 20 मार्च 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय समाज भूषणपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील सत्याग्रहाला 99 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ बुद्धिस्ट नेटवर्क सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे महाड येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र दूरदर्शनचे उपसंचालक सतीश हाडके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब समिंदर, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष खंडारे, भिमाची लेकरे ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, सचिव डॉ.संजय रायबोले, सुरेश गजभिये, दिनेश बोधनकर  व सुहास आढाव यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रा. उमेश कुऱ्हाडे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व बुके देऊन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुद्धिस्ट  नेटवर्क सामाजिक व शैक्षणिक संस्था ही समाजाभिमुख असलेले संस्था असून तिचे जाळे राज्यभर पसरलेले आहे. शासकीय सेवेत असलेले व निवृत्त झालेल्या कर्मचारी लोकांची ही संघटना आहे. नोकरी पेशात राहून सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान म्हणून त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची संस्थेची परंपरा आहे ज्यामुळे नोकरी पेशा सांभाळणाऱ्या लोकांना समाजकार्यासाठी प्रोत्साहन या निमित्ताने दिले जाते. प्रा. उमेश कुऱ्हाडे हे नोकरी पेशा सांभाळून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच त्यांचा बहुजन समाजाच्या उत्थानासाठी राबविल्या जाणाऱ्या चळवळीत हिरहिरीने सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल संस्थेने घेऊन एक मताने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्या गेली.

 याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस कोल्हापूरचे अरविंद कांबळे, चंद्रमणी गजभिये, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुधाकर कांबळे, डॉ. बालाजी लातूरे, नितीन चौरे डॉ. सिद्धार्थ वाकोडे, डॉ. मंगेश वाघदे, प्रा, अरविंद पाजारे, डॉ. मनोहर बोंद्रे, प्रा. लिनताज उके व आरुष पाझरे उपस्थितीत होते