Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय स्पर्धेत कन्नड पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रथम.



यशवंत पवार कन्नड 

 संजीवनी के बी पी पॉलिटेक्निक कोपरगाव येथे झालेल्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत तब्बल 200 पेक्षा जास्त प्रकल्प सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालय कन्नड येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागाच्या तृतीय वर्षातील आदित्य घुले, शुभम बोरसे, वैष्णवी घोलप व गौरी भागवत या विद्यार्थ्यांनी ओव्हर लोडिंग व्हेईकल डिटेक्शन इन अलर्ट सिस्टीम हा प्रकल्प सादर करत राष्ट्रीय पातळीवरती प्रथम पारितोषिक मिळविले. या पारितोषिकाच्या स्वरूपात 11 हजार रुपये व स्मृतीचिन्ह विद्यार्थ्यांना देण्यात आले.वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी “Overload Vehicle Detection and Alert System” हा अत्याधुनिक प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रणालीच्या मदतीने आता रस्त्यावरून जाणाऱ्या जड वाहनांचे वजन आपोआप मोजले जाऊन, मर्यादेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांना तत्काळ ओळखता येणार आहे.

या प्रणालीमध्ये आधुनिक सेन्सर्स, मायक्रोकंट्रोलर आणि अलर्ट यंत्रणा वापरण्यात आली आहे. वाहन ठराविक ठिकाणी बसवलेल्या सेन्सरवरून गेल्यावर त्याचे वजन मोजले जाते. जर वाहनावर जास्त भार असल्याचे आढळले, तर लगेचच अलार्म वाजतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना संदेश पाठवला जातो. 

 या विद्यार्थ्यांना तेजस दाबके सर यांनी मार्गदर्शन केले. मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी प्रतीक ठोंबरे याने राष्ट्रीय स्तरावरती प्रकल्प स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत रोख दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह घेत यश संपादित केले. 

 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.किशोर पाटील साहेब, सरचिटणीस प्रसन्ना पाटील, संचालक विश्वास बापू मोतींगे,सिद्धार्थ पाटील, अजित चौधरी, संतोष मतसागर, प्रमोद गडपायले, आशिष गावंडे, श्रीराम काळे, गोपाल दाभाडे, नवनाथ चव्हाण, शशांक मेखे आदींनी अभिनंदन केले.