राजेश आमेटवार ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली : चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर.हजारो - लाखो लोकांच्या बलिदानातून, अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेले स्वतंत्र आणि सार्वभौमत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गहाण ठेवल्याचे दिसत आहे.देशाला गुलामीकडे घेऊन जाण्याचा डाव मोदींनी आखला आहे की काय अशी शंका यावी अशी निर्णय प्रक्रियेतून देशात राबवली जात आहे.अमेरीका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी करायची अमेरीका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी नाही करायची. अमेरीका म्हणेल ते निर्णय देशात घेतले जात आहे. अमेरीका धर्जिण धोरणे आखली जात आहे. त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व मोदींनी अमेरीका कडे गहाण ठेवले आहे की काय अशी शंका येत आहे.
एपस्टीन फाईल बाहेर आल्यामुळे याचा दबाव मोदींवर असावा असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देशाला पारतंत्र्यापासून रोखावे यासाठी २३ मार्च रोजी नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या साठी नांदेड जिल्ह्यातुन हजारो कार्यकर्त्यासह आजी - माजी पदाधिकारी,नगरसेवक, सर्व तालुक्यातील तालूकाध्यक्ष व सर्व कार्यकारणी उपस्थत रहावे. असे आव्हान जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी केली आहे.तसेच
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे बैठक घेण्यात आले या वेळी प्रदेश उपाध्याक्ष फारुक अहमद सर,प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर,मराठवाड सदस्य डाॅ.संघरत्न कुर्हे, जिल्हाध्यक्ष नांदेड ( दक्षिण) शंकर महाजन, जिल्हाध्यक्ष (उत्तर) राज आटकोरे, जिल्हा महासचिव (दक्षिण) रवि,जिल्हा महासचिव( उत्तर) दीपक मगर, विठ्ठल गायकवाड महानगराध्यक्ष संजय टिके, जिल्हा संघटक डॉक्टर राम वनंजे, विनायक गजभारे जिल्हा उपाध्यक्ष, रंगनाथ गजले जिल्हा सचिव, अरुण भद्रे जिल्हा उपाध्यक्ष, जयकुमार ढवळे जिल्हा सल्लागार, विद्यानंद पवळे जिल्हा उपाध्यक्ष, गौतम डुमणे, प्रकाश कोल्हे, गणपत सवयी सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष, के. एच. वने जिल्हा उपाध्यक्ष, दीपक कसबे प्रसिद्धीप्रमुख, बालाजी सूर्यतळ जिल्हाउपाध्यक्ष, धाराजी इंगोले जिल्हा उपाध्यक्ष, उत्तम वाढवे सह संघटक, प्रल्हाद इंगोले जिल्हा सल्लागार, यासह खूप मोठ्या संख्येने नांदेड उत्तर व दक्षिणचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin