सतीश पांडे (कळमेश्वर प्रतिनिधी)
कळमेश्वर :– नियमित दररोज मॉर्निंग मिशन ग्रुप यांच्या मार्फत योगाभ्यास तसेच रोज अर्धा तास चालणे यावर नियमित व्यायामाचे धडे नवनवीन लोकांमध्ये रुजवण्याची काम ग्रुप मधील ज्येष्ठ मंडळी करत असते.
त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिक हे नवनवीन जनतेचे प्रेरणास्थान बनलेले आहे त्याकरिता विशेष होळी दिवस निमित्त मॉर्निंग ग्रुप तर्फे विशेष आयुर्वेदिक गुलाल धुळवड आयोजित करून एकमेकांना गुलाल लावण्यात आला तसेच या ठिकाणी असलेले ज्येष्ठ व्यक्ती कृष्णा बागडे ’"आपली होळी" या विषयावर छान उपक्रम! 'मॉर्निंग मिशन ग्रुप' आणि 'ज्येष्ठ-कनिष्ठ मित्रमंडळाचा' हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.
पर्यावरणपूरक होळी साजरी करून तुम्ही समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे सणांचा आनंद तर द्विगुणित होतोच, पण निसर्गाचे रक्षणही होते. मत व्यक्त केले यावेळी महादेव इखार, गणेश शिरभाते, विनोद मुंडवाईक, अरविंद दादा, बाबाराव बोबडे, सतीश पांडे सुरेश डोंगरे, त्र्यंबक गमे, मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आणि इतर नागरिक वर्ग उपस्थित होता.





Social Plugin