सतीश पांडे कळमेश्वर प्रतिनिधी
कळमेश्वर :– भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा इ.८वी ( NMMS २५-२६) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदागोमुख येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परिक्षेत ३०विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी रितीका गणेश भोयर, श्रीहरी सुरेश घुगल, समिक्षा देविदास सातपुते,श्रावणी सुरेश मिरचे, प्रणय धनराज खंते, इच्छा मोरेश्वर डाखोळे, गणेश जितेंद्र साह,कुणाक्षी गिरिश मोवाडे, प्रणय नितेश जीवतोडे,मयुरी पुरुषोत्तम पाचपुते, किंजल सुरेश बावने, धनश्री मोरेश्वर वरखडे, कृष्णाली शिवदास बल्की, प्रणाली कमलाकर विरपाची, चिन्मयी रमेश मोवाडे, नैतिक मारोती कोसरकर,प्रणाली प्रभाकर झाडे, गौरी गणेश बाळापुरे, भिमेष गौतम मेश्राम, साक्षी विनोद बिघाने हे २०विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहनजी मोवाडे, सचिव प्रा.श्री.दिनकर जीवतोडे, प्राचार्य श्री. महादेव खरबडे, ओमप्रकाश मोवाडे, सतिश चिमलवार सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडीलासह मार्गदर्शक शिरिष रंडखे,अनिता घोरमारे, पुष्पांजली मोवाडे, हर्षा वंजारी यांना दिले.





Social Plugin