Ticker

6/recent/ticker-posts

कळमेश्वर ब्राह्मणी शहरात रमजान ईदनिमित्त उत्साहात कार्यक्रम



सतीश पांडे 

कळमेश्वर : रमजान ईद निमित्त कळमेश्वर ब्राह्मणी शहरात तालुका अल्पसंख्यांक कमिटीचे अध्यक्ष व शहर अल्पसंख्यांक महामंत्री श्री. मेहमूद भाई माला धारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नगरीचे नगराध्यक्ष श्री. अविनाश हिरालालजी माकोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आरोग्य सभापती श्री. मनोजजी पुनाजी शेंडे, माजी महामंत्री राकेश देशमुख, इंटक नेते श्री. शेषरावजी केदार यांचीही विशेष उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत समाजात एकोपा, शांतता व बंधुता कायम राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू-भगिनी सहभागी झाले होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.