सिल्लोड- प्रतिनिधी: दत्ता पवार
जग्दगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक १४ व १५ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चौका येथील म्हसोबा महाराज मंदिर जळगाव रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.या ठिकाणी दिनांक १४ मार्च २०२६ रोजी साधक दिक्षा होणार असून दिनांक १५ मार्च २०२६ रोजी उपासक दिक्षा व बाल उपासक दिक्षा देखिल होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा.
सोहळ्यात आध्यात्म विज्ञान आणि व्यव्हार या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मानवी जिवनातील विविध समस्या कशा सोडविता येतील याबाबत जग्दगुरुश्री मार्गदर्शन करणारअसून उपस्थितांना त्यांच्या दर्शनाचा लाभही घेता येणार आहे भक्तांच्या सोयीसाठी कार्यक्रम स्थळी भव्य मंडप, आसनव्यवस्था व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रामानंद सांप्रदाय तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यात मरणोत्तर देहदान,रक्तदान, मोफत इंग्रजी माध्यमातून शिक्षण,मोफत वेदपाठशाळा, गरीब महिला भगिनींना मोफत शिलाई मशीन वाटप,घरघंटी वाटप,वेळी,वाटप,शेकर्यासाठी फवारणी पंप वाटप असे विविध सामाजिक उपक्रम रामानंद सांप्रदाय मार्फत राबविले जातात. या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठवाडा उपपिठाच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin