प्रतिनिधी: (रामेश्वर सुरनर)
आज दिनांक 8 मार्च रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परभणी तालुका परभणी जिल्हा परभणी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता,या कार्यक्रमांमध्ये मुलींचे कराटे प्रात्यक्षिक तसेच योगाबद्दलचे महत्त्व सुद्धा त्यांना सांगण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असणाऱ्या महिला सुचिता भरोसे, जि.प.सदस्य,ज्योत्स्ना घाडगे, जि.प.सदस्य, मोनिका गायकवाड,पं स सदस्य,
चंद्रमोरे आर व्ही मु.अ.के.जी.बी.व्ही परभणी यानी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व जीवन जगत असताना कठीण प्रसंगामध्ये न घाबरता दोन हात कसे करायचे याचे धडे दिले, तसेच उपस्थित सर्वांनी या उपक्रम निमित्त मा.शिक्षण मंत्री भुसे साहेब यांचे आभार मानले व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या.शिक्षण परिषद यांना शिक्षणाधिकारी बिर्गे मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे हा उपक्रम पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.





Social Plugin