Ticker

6/recent/ticker-posts

स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी.




प्रतिनिधी: प्रा विजय गायकवाड

   रिसोड:- स्थानिक स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे . प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषणातून आपले मत व्यक्त करताना असे म्हटले की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू,उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर", “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. प्रकाश हनवते यांनी केले. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम डॉ. केशव कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.