Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलचा तुटवडा, वाहनधारकांची पंपावर गर्दी.



संतोष वाठोरे@

जिल्हा प्रतिनिधी हिंगोली

दिनांक 26 मार्च 2026 गुरुवार.

 आज दिनांक 26 मार्च रोज गुरुवार संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा  तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहन धारकाच्या लांबच लांब रांगा लागत असून किरकोळ तंटे व वाद होत आहेत.

 हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक पंपावर कालपासून पेट्रोल व डिझेलचा खूप मोठा तुटवाडा निर्माण झाला असून, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वाहनधारक त्रस्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून काल निघालेले परिपत्रक आज रोजी पूर्णतः चुकीचे वाटत आहे. घरगुती गॅस व व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे  सर्वसामान्य नागरिक हवालदील झाले असून आता त्यामध्ये अडचणीत भर म्हणून डिझेल व पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. श्री सरकारने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवावा.