Ticker

6/recent/ticker-posts

अंजनी खुर्द येथे बस थांब्यासाठी आमरण उपोषण





शेख बाबा (लोणार प्रतिनिधी)

सविस्तर वृत्त असे की, लोणार तालुक्यातील मौजे अंजनी खुर्द हे गाव मुंबई -नागपूर महामार्गांवर असलेले अत्यंत महत्वाचे गाव असून या ठिकाणाहून व शेजारील 20 ते 22 खेड्यापाड्यातील नागरिक, विद्यार्थी व रुग्ण हे दररोज जालना,छत्रपती संभाजी नगर,मुंबई,अमरावती,अकोला, नागपूर याठिकाणी ये -जा करतात आणि या गावाला बस थांबा मंजूर असतांनाही अनेक बस थांबत नाहीत.

गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. गजानन माणिकराव गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी वारंवार संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊनही हा प्रकार बंद होत नसल्याने व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पत्रक असूनही बसेस थांबत नसल्याने आज दि. 23/03/2026 वार सोमवार रोजी शहीद दिनाच्या पूर्व संध्येला श्री. गजानन माणिकराव गायकवाड, शेख युनूस शेख गफूर, शेषराव लहाने, अरुण तनपुरे व इतर ग्रामस्थ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याशेजारी आमरण उपोषणास सुरुवात केली व सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही अशी ग्वाही उपोषण कर्त्यांनी दिली.