बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या आदर्श विद्यालयात नुकतीच चिमण्याकरता तसेच अन्य पक्षांकरता घरे,घरटी बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. वाढत्या शहरीकरणामुळे सर्वांची लाडक्या चिऊताईची संख्या प्रचंड घटली आहे. याकरता विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृती निर्माण करून पक्षांप्रती प्रेम वाढीस लावणे करता आज विद्यालयात प्रत्यक्ष कार्यशाळा व प्रबोधन करण्यात आले. उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पक्षांकरिता पाणी तसेच चिमणचारा ठेवावा. निसर्गप्रेम, पक्षी प्रेम वाढीस लावावे.यासाठी शाळेत हा उपक्रम घेण्यात आला होता. सदर उपक्रमात जवळपास 150 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
त्याला कला शिक्षक श्री अजित काळे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.श्री मोहनराव गुरव यांनी विदयार्थ्यांना प्रबोधन केले. या कार्यशाळेचे संस्था अध्यक्षडॉ.श्री सुरेशराव जाधव,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,सर्व संस्था विश्वस्त, पदाधिकारी, विदयार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, प्राचार्य श्री. डी. एन.गोफणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक केले.
.jpg)




Social Plugin