ग्रामीण प्रतिनिधी,, महंमदरफी मदार आदमपूरकर
नांदेड:मुखेड तालुक्यातील ग्राम खरब खंडगांव येथील नागरिक संतोष पाटील यांचा मुलगा होतकरू तरूण सतिश उर्फ बंटी संतोष कदम याची बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट पदी गुणवत्तेवर निवड झाली.गावी परतल्यावर महादेव मंदिर ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत गावकरी व मिञ परिवारासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आपल्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याने हे यश मिळवून स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.जिद्द,चिकाटीने काहीतरी वेगळे करून दाखविण्याची इच्छा यशस्वी निकालात परिवर्तीत झाली!आई वडिलांच्या कष्टांचे चीज झाल्याची भावना गावात स्वागत सत्कार सोहळ्यात त्याने व्यक्त केली.
सदरील कार्यक्रमास विद्यमान सरपंच डाॅ.रणजित काळे,माजी सरपंच व्यंकट एकाळे,महाराष्ट्र ग्रामीण बँक सहाय्यक महमदरफी मदार, संतोष कदम,शेख माजीत, शेख शब्बीर,भगवान जाधव, हाणमंत कदम, नागनाथ एकाळे,होमगार्ड शिपाई शंकर कदम,किसन एकाळे, व्यंकटराव कदम,नागनाथ गंगाधर एकाळे,शंकर बापूराव कदम, नामदेव कदम,कदम परिवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी आदिंची उल्लेखनीय उपस्थिती होती....





Social Plugin