ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील हर्ष इंग्लिश स्कूल चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दि.६ मार्च रोजी गावातील शिवालय मंदिर परिसरात सायंकाळी उत्साहात संपन्न झाला.प्रथमतः संस्थेचे व कार्यक्रम अध्यक्ष माजी व्हाईस चेअरमन तथा व्यावसायिक बालाजी डुब्बेवार सावकार यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमातदेशभक्तीपर, शेतकरी, ऐतिहासिक,ग्रामीण परंपरा, गवळण,बालगीत,हिंदी-मराठी चिञपटातील जुन्या व नव्या गाण्यांवरती चिमुकल्या मुलांनी बहारदार नृत्य करीत गावकरी रसिक व पालकांकडून रोख बक्षीस मिळवत प्रोत्साहनरूपी टाळ्यांच्या स्वरूपात शाबासकी मिळविली आहे. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष बालाजी डुब्बेवार,शाळेचे मुख्याध्यापक गौतम भेदेकर,माणिकराव पाटील,
महाराष्ट्र ग्रामीण बँक सहाय्यक महमदरफी मदार, ग्रामपंचायत पंप ऑपरेटर राम हालबुर्गे,शिक्षक विश्वजीत गायकवाड, शिक्षिका राहू योगेश भुरे,नितीश हालबुर्गे, आनंद इंगळे,चंद्रकांत गायकवाड,बालाजी नागेश्वर, मन्मथअप्पा मठपती,दैशोन्नती पञकार काशिनाथ वाघमारे,तरूण भारत पञकार जाफर आदमपूरकर, नागनाथ लमले,दिनकर कोळनुरे,गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक,विद्यार्थी आदिंची उल्लेखनीय उपस्थिती होती.





Social Plugin