Ticker

6/recent/ticker-posts

जाफराबाद पथक मध्ये फलटण नाईक पदी मंजीराम ऊखर्डे यांची नियुक्ती.



टेंभुर्णी प्रतिनिधी () विष्णु मगर

जाफराबाद तालुक्यातील होमगार्ड पथक मध्ये फलटण नाईक पदी टेंभुर्णीचे होमगार्ड मंजीराम ऊखर्डे, शिवाजी सुद्रिक, भगवान कुमकर यांना नुकतीच होमगार्ड पथकाने बढती मिळाली आहे.  या प्रमोशन चे स्टार व लेबल लावून टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती ,पोलीस जमादार चौधरी , यांच्या हस्ते स्टार लावून त्यांचे सन्मान करण्यात आले आहे. 

 या वेळी तुम्ही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन तिडके , निवृत्ती सोनवणे, गंगाधर खरात , ठाकरे ,सागर शिवरकर व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

त्यांच्या या उच्च पदावर प्रमोशन झाल्याने टेंभुर्णी गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे त्याचबरोबर तुम्ही पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार विष्णू मगर ,रावसाहेब अंभोरे,बि. डी .सवडी, संजय राऊत, अशोक पाबळे, सुनील भाले, विनोद कळंबे, सुनील जोशी, फकरु कुरेशी, शाबेर शेख आदिने अभिनंदन केले आहे.