Ticker

6/recent/ticker-posts

खळेगाव येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या अपुऱ्या जागेचे स्वप्न गावकर्यांकडून पूर्ण!



देविदास वायाळ लोणार - ग्रामीण प्रतिनिधी 

लोणार तालुक्यातील खळेगाव येथील हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण परिसरात दूर दूर पर्यंत नावारूपाला आलेले देवस्थान आहे.गावातील जुन्या प्रौढ गावकरी मंडळीच्या सांगण्यानुसार रामदास स्वामींनी गावोगावी स्थापित केलेल्या ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे खळेगावचे मारोतीची मूर्ती आहे.

येथील महारुद्र मारोतीरायांची मूर्ती रामदास स्वामींनी स्थपणा केलेली आहे अशी अख्यायिका आहे.या देवाचे गावात तर आहेच परंतु आसपास दुरपर्यंत पर्यंत भाविक भक्त आहेत.या ठिकाणी गावातील व बाहेर गावातील काही भक्त आपल्या मनातील नवस बोलतात व पूर्णही करतात. या महारुद्राला नवसाचा मारुती म्हणण्यास ही हरकत नाही.गावात मारुतीरायांच्या नावाने नवसाचे गावाला दरवर्षी १५ ते २० नगरभोजननाचे नवस फेडले जातात. नगरभोजणच काय परंतु भक्त आर्थिक, अन्नदान, भूमिदानासाठीही मदत करत असतात.

असेच देवस्थानासाठी जागा अपुरी पडत असल्याने यावर्षी गावकर्यांनी जागा वाढविण्याचे ठरवले आणि ती इच्छा पूर्ण केली आपआपल्या परीने गावकर्यांनी जागा वाढविण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि सढळ हाताने मदत केली व करत आहेत.

गावकर्यांनी वर्गणी करून १८ ते २० हजार चौरस फूट जमीन देवस्थानासाठी वाढवण्याची इच्छा पूर्ण केली. त्याअर्थाने गावातील सर्व गावकरी आनंदी व उत्साही आहेत.मारोतीरायांचा भरभरून आशीर्वाद पाठीशी राहावा अशी गावाकऱ्यांची इच्छा आहे.

दरवर्षी हनुमान जन्मासोहळा निमित्ताने रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत गावात मारुतीरायांचा अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात साजरा केला जातो तसाच या ही वर्षी दि.२६ मार्च गुरुवार रामनवमी ते ०१ मार्च २०२६ बुधवार पर्यंत अखंड हरीनाम साप्ताह व दि. ०२ मार्च २०२६ गुरुवार हनुमान जयंती चे दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा करून महाप्रसाद राहिल.ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोरे यांच्या मधुर वाणीतून श्रीमद भागवत कथेचा व ७ दिवस हरी कीर्तनांचे आयोजन केले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी कथेचा व कीर्तनांचा लाभ घ्यावा.      तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बाहेरील मान्यवर भक्तांनीही देवस्थानासाठी आपापल्या परीने सढळ हाताने मदत करावी ही अपेक्षा गावकर्यांनी व्यक्त केली आहे.