बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या आदर्श विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कु.आर्यन गणपती पवार याची नवोदय विद्यालय (खावली) सातारा येथे नुकतीच निवड झाली. इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारा आर्यन हा सैनिक स्कूल निवड चाचणी तसेच विविध स्पर्धेमध्ये देखील चमकला असून ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आर्यनने मिळवलेले यश सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव हे विद्यालय जिल्ह्यातील नामांकित विद्यालय असून या शाळेने "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"( अभियान टप्पा क्रमांक तीन ) माध्यमिक गटात खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुणवत्तेबरोबर संस्कार जपत या शाळेमध्ये नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात.
कु.आर्यनच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के.डी.पवार सर,श्री डी.पी. शिंदे सर, श्री जयंतराव जाधव सर,श्री एस.आर.पाटील सर, प्राचार्य श्री डी. एन. गोफने,आजी माजी विद्यार्थी संघ,पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशी ग्रामस्थ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्यन पवार यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणाकरता शुभेच्छा दिल्या.





Social Plugin