बेटावद खुर्द ता. जामनेर गावचे सुपुत्र आदरणीय राजेंद्र वखरे यांचे चिरंजीव शिवम राजेंद्र वखरे यांची UPSC सिविल सर्विस परीक्षा अर्थात I A S परीक्षेत भारतातील सर्वात टॉप ६५१ रँक ने उत्तीर्ण झाल्याबद्दल संत सेना माऊली प्रतिष्ठान जामनेर च्या वतीने व जामनेर नगरपालिकेचे नगरसेवक श्रीमान विश्वास बापू पर्वते यांच्या उपस्थितीत शिवम वखरे यांचे बेटावद खुर्द गावी जाऊन सत्कार करण्यात आला व समाजाची .गावाची. देशाची. सेवा घडो अशाप्रकारे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व समाजप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी पंचक्रोशीतील मान्यवर व बेटावद खुर्द येथील प्रतिष्ठित मान्यवर तसेच विश्वास बापुंसोबत नाभिक समाजाचे ज्येष्ठ संचालक श्री रामप्रसाद चंदेले माऊली प्रतिष्ठानचे जामनेर शहर अध्यक्ष दीपक पर्वते व जिल्हाध्यक्ष प्रवीण पर्वते जामनेर तालुका युवक अध्यक्ष गोपाल राऊत सह कोषाध्यक्ष सुदर्शन सोनवणे व बोदवड येथून आलेले संजय वाघ विवेक वखरे व राजू डापसे सोनू राजपूत बेटावद ही सर्व मंडळी शिवम वखरे यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित होते





Social Plugin