Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर सर्वधर्मीय शिवनाम,शिवकथेस प्रारंभ



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे १८ वा सर्वधर्मीय अखंड शिवनाम व शिवमहापुरान कथा गुरुवार दि.१९मार्च रोजी थोर गुरूवर्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ होत आहे.शिवकथाकार म्हणून सुप्रसिद्ध श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य प.पू.श्रीश्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांच्या रसाळ वाणीतून या संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची श्रवणीय अनुभूती दैनंदिन भक्तांना मिळणार आहे.

अनुक्रमे गुरूवार दि.१९ मार्च रोजी शि.भ.प.कु. सावित्रीताई मळभागे जंगमवाडीकर,शि.भ.प.निळकंठ विभूते गुरूजी लातूरकर,शि.भ.प.संगिताताई हाळे टाकळीकर,शि.भ.प. कैलास महाराज डोंगरगावकर, शि.भ.प.मन्मथअप्पा डांगे गुरूजी उस्माननगरकर,

श्री.ष.भ.प.१०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगांवकर,श्री.ष.भ.प.१०८ दिगांबर शिवाचार्य 

महाराज वसमतकर शेवटी गुरूवार दि.२६ मार्च 

रोजी श्री.ष.भ.प.१०८ महादेव शिवाचार्य महाराज 

वाईकर याचे महाप्रसादावरील किर्तन संपन्न होईल.

गुरूवार दि.१९ मार्च पासून अनुक्रमे गुढीपाडवा त्यानंतर 

कै.गंगाधर रामचंद्र डुब्बेवार यांच्या स्मरणार्थ,दिवंगत पिरसाब मदार यांच्या स्मरणार्थ माजी बँकर फक्रूशा पिरसाब मदार,माधव इरन्ना बिद्राळे,सहशिक्षक शिवराज हाणमंतराव पाटील,रमेश काळबा डोंपे यांच्या स्मरणार्थ, माजी सरपंच अरविंद बाळासाहेब पेंटे अखेरीस महाप्रसाद दिलीप महाजन देसाई या सर्व शिव भक्तांच्या वतीने दररोज गावकरी भक्तांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम अनुक्रमे पहाटे शिवपाठ,सकाळी रूद्राभिषेक,परमरहस्य पारायण,

आशिर्वचन,भोजन विश्रांती,दुपारी शिवमहापुरान कथा,सायंकाळी गाथा भजन शिवपाठ,महाप्रसाद आस्वाद,विश्रांती,राञी शिवकिर्तन,शिवजागर २ 

वाजेपर्यंत नित्यक्रम नियमित सुरू राहील.कलावंत

सिंथ व गायक अभिजित पावडे,तबला गजानन चौधरी,अमरावती,पॅड संतोष सुंबे,अहिल्यानगर,

झाँकी प्रदिप काका काळे,छञपती संभाजीनगर

अशोक हालबुर्गे,कपिल हांद्रे,बँन्जोवादक

मराठी चित्रपट संगीतकार प्रा.संदीप भुरे,

शि.भ.प.अशोक अप्पा गुडफळे,संगीत विशारद

बाबू स्वामी यांचा सहभाग असणार आहे.

सदरील सोहळ्यात विविध भागातील गायक,गायिका, भजनी मंडळ,विणेकरी,वादक,व्यासपीठ प्रमुख,पारायण प्रमुख,शिवपाठ प्रमुख,चोपदार,पुजारी आणि गाव परिसरातील सहभागी आचारी,अनुयायी यांचा विशेष सहभाग असणार आहे.आदमपूर गाव परिसरातील सदभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन समस्त गावकरी मंडळी आदमपूर यांनी केले आहे.