सतीश पांडे
कळमेश्वर :संत रविदास चर्मकार समाज भवन येथे दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा या उद्देशाने UDID (युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्ड नोंदणी मोहीम आयोजित करण्यात आली. ही मोहीम युथ फोर्स व शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने राबविण्यात आली.
या मोहिमेत दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना UDID कार्डसाठी अर्ज करण्यास मदत करण्यात आली. तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शनही देण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
कार्यक्रमाला मीरा शेनॉय युथ 4 जॉब्स फाऊंडेशन सो्थापक आचल पोकळे दिव्यांग मित्र, सौरभ चांदणे दिव्यांग जिल्हा समयक, केतकी नीलजकर प्लेसमेंट ऑफिसर, विनोद सातंगे शिवसेना जिल्हा प्रमुख,बिरजू रघुवंशी शिवसेना तालुका प्रमुख, प्रमोद शेवतकर शहर प्रमुख, वनिता गुल्हाने महिला प्रमुख, अपर्णा मुसळे ब्राह्मणी महिला प्रमुख, कुसुम मेहेकर युवती प्रमुख, मोंटू शिरसाट युवा सेना प्रमुख,योगेश टेकाडे, सचिन रघुवंशी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे आभार मानले.





Social Plugin