सिल्लोड येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न
प्रतिनिधी - आकाश कोके - सिल्लोड
सिल्लोड येथील माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय, सेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीस शिवसेना छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख विलास पारकर, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगराध्यक्ष अब्दुल समीर,जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा.गाढे डॉ विठ्ठल पा.जाधव, तालुकाप्रमुख केशवराव तायडे,सभापती विश्वास दाभाडे, उपजिल्हाप्रमुख देविदास लोखंडे, तसेच यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. आगामी गावपातळीवरील व सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पक्षाची कामगिरी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
🗳️ महत्त्वाचे आवाहन:
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनःनिरीक्षण कार्यक्रम (SIR) सुरू आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या BLO यांना सहकार्य करून आपली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास नोंदणी व दुरुस्ती वेळेत करून घ्यावी.
👉 सुयोग्य व शुद्ध मतदार यादीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.





Social Plugin