Ticker

6/recent/ticker-posts

रणजीत शिंदे यांची भाजपा खटाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 गेली अनेक वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले, सहकार क्षेत्रात सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय देणारे, माजी ग्रामपंचायत सदस्य, जांबचे सुपुत्र रणजित दिनकर शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

         रामेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जांबसह परिसरातील गावांमध्ये रणजित शिंदे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करत आहेत. ते प्रगतीशील शेतकरी आहेत. आजवर ते सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे आणि पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन यांच्या विजयी करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची कायम भूमिका असते. त्यामुळेच त्यांच्या कामाची दखल वरिष्ठ नेतृत्वाने घेत त्यांची भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुका उपाध्यक्ष पदी एकमताने निवड केली आहे. 

          खटाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.प्रिया शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

          रणजित शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे, विक्रम पावसकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, माजी पंचायत समिती सदस्य दगडूदादा शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, पं. स. सदस्य शशिकांत रोमन, गणपतराव शिंदे, जितेंद्र शिंदे, माजी सरपंच कॅ.बबनराव घाडगे, माजी सरपंच सुखदेव शिंदे, नारायण शिंदे, सुरेश जाधव, भगवान चव्हाण, बाबूराव जाधव, उद्योजक किरण शिंदे, राजेंद्र शिंदे, सोमनाथ भोईटे, हनुमंत चव्हाण, विठ्ठल चव्हाण, रमेश चव्हाण, नवनाथ शिंदे, मंगेश शिंदे, विक्रांत शिंदे, धनाजी टकले, अमोल शिंदे, सुदाम घाडगे व रामेश्वर ग्रामविकास संघटनेचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

     जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार : रणजित शिंदे 

      भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. या निवडीमुळे तालुकास्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत पक्ष ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य, रामेश्वर ग्रामविकास संघटनेचे प्रमुख,मार्गदर्शक दगडूदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याची ग्वाही रणजित शिंदे यांनी दिली.