संतोष फुलारी @ ग्रामीण प्रतिनिधी
दि.10 एप्रिल 2026 भेंडा बुद्रुक
(ता. नेवासा, जि. अहिल्यानगर)येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता बस स्टँड, भेंडा बुद्रुक येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समाज प्रबोधनकार व महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. श्री. अनिल लोखंडे सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांमधून उपस्थितांना महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा मिळणार आहे.
महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेले कार्य आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा जागर प्रसार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ भेंडा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.





Social Plugin