बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना पाठ्यपुस्तकांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय स्तरापासून त्याचा अभ्यास करावा. अभ्यासाची सलग बैठक असावी. जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होण्याकरता सतत सराव प्रयत्न व आत्मविश्वास हवा. यातून यश प्राप्त होते.
ग्रामीण भागातील सैनिक स्कूल करता प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आहे . फाउंडेशन संचलित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका अत्याधुनिक सोयीने युक्त असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ . नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे यांनी केले.
डी. एन.जाधव फाउंडेशन संचलित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका यांच्या वतीने श्री सेवागिरी महाराज सांस्कृतिक भवन पुसेगाव येथे आयोजित यशस्वीतांचा सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी 108 परमपूज्य श्रीमंत श्री सुंदरगिरीजी महाराज होते.
यावेळी . श्री मनोज रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर तसेच वैदेही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी त्यांचा स्पर्धा परीक्षा विषयीचा अनुभव सांगितला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पदी निवड झालेल्या कु.ऐश्वर्या प्रदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डी. एन जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष व
माजी कामगार आयुक्त . सुरेश जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये अभ्यासिकेचा हेतू स्पष्ट करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत आत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमास देवस्थानचे चेअरमन श्री संतोष वाघ, विश्वस्त डॉ.श्री सुरेशराव जाधव,
श्री रणधीर जाधव, श्री संतोष बाळासाहेब ऊर्फ जाधव, श्री सचिन देशमुख, श्री गौरव जाधव, श्री किशोर जाधव,कार्यकारणी सदस्य सचिव श्री श्रीधर जाधव,श्री राजेश देशमुख, विविध शाळांचे विद्यार्थी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संतोष वाघ यांनी आभार मानले
श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin