प्रतिनिधी : प्रा विजय गायकवाड
रिसोड:- दि.१४/०४/२०२६ स्थानिक स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.आदिनाथ बदर यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.एम.एन. गायकवाड यांनी डॉ.आंबेडकरांनी बुद्धी व कर्तबगारीच्या जोरावर शोषित,पिडीतांचा आवाज बुलंद केला.गावकुसा बाहेर राहणाऱ्या खितपत पडलेल्या लोकांना समता, न्याय,बंधुता,समान हक्क आणि अधिकार संविधानामार्फत प्राप्त करून दिले.जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, राज्यघटना लिहून समाजाप्रत अर्पण केली. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रकाश हनवते यांनी केले.आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.केशव कोकाटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.आम्रपाली भगत, डॉ.सिद्धार्थ इंगोले यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.





Social Plugin