Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला खरी गरज; श्री. बाळासाहेब खाडे सर यांचे प्रतिपादन



तडवळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

 बुध  दि . (प्रकाश राजेघाटगे ):

"आजच्या काळात समाजाला खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन तडवळे (ता. खटाव) येथील  श्री. बाळासाहेब खाडे सर यांनी ग्रामपंचायतमध्ये. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना खाडे पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजहितासाठी आवश्यक तो सर्व निधी खर्च केला जात आहे. भीमज्योतीचा परिसर सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत. तसेच, गावातील तरुणांना आणि नागरिकांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत, यासाठी येत्या काही दिवसांतच गावात एक भव्य आणि दिव्य असे वाचनालय उभारण्याचा आमचा ठाम मानस आहे.

या कार्यक्रमाला अँड.अनिल बनसोडे सर, सुरेश फाळके, सुभाष बनसोडे,नंदकुमार पळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत साबळे, जालिंदर साबळे, आबा आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अँड अनिल बनसोडे  हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी, सुरेश फाळके, शशिकांत साबळे, जालिंदर साबळे आणि नंदकुमार पळे ,सुभाष बनसोडे, यशवंत पाटोळे बाळासो पाटोळे दादा शिंदे महादेव साबळे यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.