Ticker

6/recent/ticker-posts

हिप्परगा थडी येथे अखंड हरिणाम सप्ताह सुरुवात - मा.जि.प.सदस्य गणेश पा. मरखले यांच्या हस्ते कळस पूजन.



बिलोली - आमेटवार राजेश

बिलोली : तालुक्यातील हिप्परगा थडी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अखंड हरीनाम सप्ताहाचे ( वर्ष नववे )आयोजन करण्यात आले. 

या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून, सप्ताहानिमित्ताने शुक्रवारी कळस मांडून देव देवतांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व आरती करून हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली.दरम्यान मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सप्ताहाच्या अनुषंगाने धार्मिक कार्यक्रमाशिवाय भक्तांकडून विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळांची सजावट करून सुशोभीकरण करण्यात आले.पंचकळस ची पूजा सर्वप्रथम मा. परिषद सदस्य प्रतिनिधी श्री गणेश पाटील मरकले शिंपाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित हिप्परगा थडी येथील पोलीस पाटील श्री शंकर महाराज मठपती,तंटामुक्ती अध्यक्ष शेषेराव मामडे,गुरु महाराज मठवाले, बशु महाराज मठपती,गडकिंदे शेवाळकर, सप्ताहाचे अध्यक्ष मल्लू परसुरे,त्याच बरोबर आमेटवार केरबा,पेठेकर मल्लू, यादवराव चिनोड, प्रकाश आमेटवार,धनुरे गंगाधर, तुकडे लक्ष्मण,तुकडे साईनाथ,हणमंत अजगरे,मारोती आमेटवार, हणमंत तुकडे आणि तसेच गावातील युवा वर्ग उपस्थित होता.आणि हा सप्ताह दि. १७/०४/२०२६ पासून सुरु आणि २४/०४/२०२६ ला समाप्ती आहे. या सप्ताहचे रूपरेषा अशी आहे कि पहाटे ४ ते ६ काकडा,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,११ ते १२ गाथाभजन,दुपारी १ ते २ मध्यन्त भोजन,सायं.६ ते ७ हरिपाठ,७ ते ८ जेवन,रात्री ८ ते ११ हरिकीर्तन होणार आहे.

 तसेच यावेळी गायनाचार्य मोगलाजी तुकडे, प्रकाश पाटील लोंढे,विठ्ठल पाटील परभणीकर,डॉ. खटके साहेब सगरोळीकर,विष्णु महाराज इत्यादी मंडळी असून कीर्तन सेवा दि.१७/४/२६ ह.भ.प इंगळे महाराज,दि.१८/४/२६ ह.भ.प अरविंद महाराज सोनखेडकर,दि.१९/४/२६ ह.भ.प भागवताचार्य वैष्णवी दिदी गोड,दि.२०/४/२६ ह.भ.प ज्ञानेश्वरी ताई गेवराईकर,दि.२१/४/२६ ह.भ.प कु. बाल किर्तनकार भाग्यश्री दीदी शहापूरकर,दि.२२/४/२६ ह.भ.प शितल ताई देवकते,दि.२३/४/२६ ह.भ.प विकास महाराज देवकते आणि दि.२४/४/२६ रोजी सप्ताह चा काल्याचे किर्तन होणार असून सप्त्याहाची सांगता होईल त्यानंतर महाप्रसादच कार्यक्रम होणार आहे. सर्व पंचक्रोशातील सर्व जातीधर्मातील भाविक भक्तांनी या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहावे असे सप्ताह कमिटी कडून सांगण्यात आले आहे.