Ticker

6/recent/ticker-posts

धाडगेवस्ती येथे भव्य पंचमंदिनी नामस्मरण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन



–शरद धाडगे@ अहील्यानगर ग्रामीण प्रतिनिधी

न. चिंचोली – ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदासबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य पंचमंदिनी नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. २५ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान नामसाधना आध्यात्मिक साधक आश्रम, धाडगे वस्ती, नजीक चिचोंली, ता. नेवासा येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. 

विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून दररोज हरिकीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ह. भ.प.महादेव महाराज धाडगे व आयोजकांनी केले आहे.