सडादाढोली येथील नवदाम्पत्य पती-पत्नीचा दुर्दैवी अंत
पाटण (दिनकर वाईकर)
कराड– चिपळूण मार्गावरील येरफळे ता, पाटण येथील गावाच्या हद्दीतील असणार्या गारवा हॉटेलच्या समोर रस्त्यावर आज सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिक अप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोंठा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर असणारे नवदाम्पत्य पती- पत्नीचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. या दोघांचे लग्न दहाच दिवसापूर्वी झाले होते. अचानक ही दुदैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे
सविस्तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सडादाढोली तालुका पाटण येथील राजू विठ्ठल झोरे, वय- २५ व पत्नी राणी राजू झोरे, वय- २३ हे दोघे सोमवार दि. २० रोजी दुचाकीवरून शिराळा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाले होते. दुपारी दोन च्या सुमारास हा भीषण अपघात झाला त्यामध्ये राजू झोरे याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी राणी हिला कराड येथे दवाखान्यात घेऊन जात असताना तिचादेखील मृत्यू झाला. या प्रकरणी पिक अप चालक सचिन यशवंत मोहिते, बोंद्री याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा सपोनी अविनाश कवठेकर अधिक तपास करीत आहेत.





Social Plugin