बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील नारायण बापु सुर्यवंशी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत विविध शाखेत २२ वर्ष नोकरी केली . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे . पुणे येथील टाटा मोटर्सचे कर्मचारी धनंजय सुर्यवंशी व इंडियन नेव्ही रिटायर्ड व सध्या पुणे येथील कृषी आयुक्तालयात कर्तव्य बजावणारे तानाजी सुर्यवंशी यांचे ते वडिल होते . तर इंडियन आर्मीत ऑफीसर असणारे अजय सुर्यवंशी व . राष्ट्रीय फुटबॉल संघात खेळणारे अभिषेक सुर्यवंशी यांचे ते आजोबा होते . सावडणे व दशक्रिया विधी बुधवार दि . २२ रोजी सकाळी ८ .३० वाजता बुध येथे होणार आहे .





Social Plugin