Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या शैक्षणिकसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न



अध्यक्षपदी डॉ. श्री. सुरेशराव जाधव,  सचिवपदी श्री मोहनराव जाधव यांची निवड 

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या  संस्थेची ग्रामीण व डोंगराळ भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने सन 1964 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.  पुसेगाव येथील या नामांकित संस्थेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. 

या सभेत सन 2026 ते 2031 या पाच वर्षाकरिता अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव , खजिनदार पदांच्या निवडी बिनविरोध झाल्या.या पदाधिकाऱ्यांचे काम अतिशय उत्कृष्ट  असल्याने या सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या. संस्थेच्या वतीने सध्या राबवण्यात येत असलेल्या भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत व विद्यार्थी विकास गुणवत्ता वाढ, त्याचप्रमाणे विविध भौतिक सुविधा इत्यादी विषयांवर चर्चा झाली.

सदर सभेचे प्रास्ताविक  श्री. सुभाषराव जगन्नाथराव जाधव यांनी केले.अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव खजिनदार या निवडी बाबतचा ठरावकॅप्टन श्री. विष्णू कृष्णा खटावकर यांनी मांडला.डॉ.श्री सुभाष शंकर आगाशे  यांनी अनुमोदन दिले. इतर सर्व सदस्यांनी त्यास सर्वानुमते  मंजुरी दिली.सन 2026 ते 2031 अखेर या संस्थेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे......डॉ. श्री सुरेशराव सर्जेराव जाधव - अध्यक्ष,.श्री बाळासाहेब शंकरराव जाधव- उपाध्यक्ष ,श्री मोहनराव रघुनाथराव जाधव - सचिव,श्री लक्ष्मणराव महादेवराव जाधव- खजिनदार   तसेच विश्वस्त म्हणूनश्री . सुभाषराव जगन्नाथराव जाधव श्री.विष्णू कृष्णा खटावकर,.डॉ.श्री सुभाष शंकर आगाशे ,श्री .विश्वनाथ सखाराम जाधव , श्री.विलासराव जगन्नाथराव जाधव, श्री. योगेशराव हनमंतराव देशमुख ,श्री सूर्यकांत राजाराम जाधव .

या नूतन कार्यकारिणीसाठी संस्था सदस्य श्री जयंतराव सर्जेराव जाधव आणि सदस्य विजयसिंह जयसिंगराव जाधव तसेच संस्थेच्या विविध शाखांची मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.