Ticker

6/recent/ticker-posts

बोईसरमध्ये बेकायदेशीर पार्किंगचा कहर – अपघातांची मालिका सुरूच!



पालघर जिल्हा : धनेश क्षिरसागर 

पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील यशवंत सृष्टी मागील रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या रस्त्यावर सियाराम कंपनी J177 समोर दररोज कंपनीमध्ये येणाऱ्या ट्रक व इतर वाहनांना पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने चालक थेट रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. 

त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे व सतत अपघात घडत आहेत.

👉 गेल्या काही दिवसांत या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काही नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

👉 या मार्गावर शाळेच्या बसेसही ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

👉 सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे वाहन उभी करणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे.

👉 या संदर्भात एडवोकेट बिपिन दशरथ संखे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई केली.

👮‍♂️ कारवाई करणारे पोलीस अधिकारी :

आमजद हसीना चांद सय्यद – पो. हवालदार, बोईसर

श्रीकांत तांदळे – पो. हवालदार, बोईसर

पोलिसांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तसेच संबंधितांना कडक सूचना दिल्या.

📌 स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पुढील काळातही अशाच प्रकारे नियमित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

👉 नागरिकांची मागणी :

• बेकायदेशीर पार्किंगवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी

• संबंधित कंपनीस स्वतंत्र पार्किंगची सक्ती करावी