Ticker

6/recent/ticker-posts

तडवळे येथे अभयसिंह जगताप समूहातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; 'क्रिकेटची पंढरी' म्हणून गावाची ओळख - बाळासाहेब खाडे

 


बुध दि .  (प्रकाश राजेघाटगे):

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) सरचिटणीस तथा खटाव-माणचे नेते श्री. अभयसिंह जगताप मित्र समूह आणि युवा क्रिकेटर श्री. सतपाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तडवळे (ता. खटाव) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपयांचे भरघोस बक्षीस ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक प्रतीक खाडे, श्री. बाळासाहेब खाडे सर, दत्ता फाळके, अभिजीत साबळे (खंडोबा यात्रा कमिटी), सुधीर माळवे (भैरवनाथ यात्रा कमिटी सदस्य) आणि माजी उपसरपंच बाळासाहेब पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी माजी सरपंच गोपीनाथ खाडे, युवा नेते सुनील खाडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक डॉ. प्रकाश पाटोळे, सेवानिवृत्त हवालदार बाळासो साबळे,  जे. के. काळे आणि सचिन पळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तडवळे म्हणजे क्रिकेटची पंढरी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच प्रतिनिधी श्री. बाळासाहेब खाडे सर म्हणाले की, "तडवळे हे गाव क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. वर्षातून ५ ते ६ वेळा येथे भव्य स्पर्धांचे आयोजन होते, ज्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. आज क्रिकेट हा केवळ खेळ उरला नसून तो एक व्यवसाय झाला आहे, ज्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो."

या स्पर्धेसाठी केवळ ८ निमंत्रित संघांना संधी देण्यात आली असून, दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गोपीनाथ खाडे यांनी केले, तर आभार सचिन पळे यांनी मानले. या स्पर्धेमुळे तडवळे आणि परिसरातील क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.