Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञान व विषय कौशल्ये व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त -डॉ. श्री सुरेशराव जाधव



(नूतन संस्था पदाधिकारी सत्कार समारंभ उत्साहात  संपन्न )

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

विद्यार्थ्यांनी   नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात. प्रत्येकाने स्वतः ला अदयावत ठेवावे.संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जात असून (ए.आय.)कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात संस्था नेहमीच प्राधान्य देत आहे.या संस्थेतून अतिशय चांगले विद्यार्थी घडत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी बनावे तसेच विषय ज्ञान व ज्ञान कौशल्ये वाढवावीत. आदर्श, बुद्धिवान, संस्कारी विद्यार्थी घडवण्यास संस्था यशस्वी ठरली आहे . विषय ज्ञान व कौशल्ये विद्यार्थी व्यक्तिमत्व घडवण्यास उपयुक्त घटक आहेत. सर्व संस्था पदाधिकारी विश्वस्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत या संस्थेचा विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या कामात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोठे योगदान लाभत आहे.असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले.

 संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने नवनियुक्त संस्था पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार समारंभ विविध शाखा च्या वतीने नुकताच पार पडला या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्याकरता तसेच संस्थेच्या विविध शाखांना आधुनिकतेची जोड देण्यास संस्था प्रयत्नशील आहे असे विचार उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी मांडले.

 प्राचार्य श्री गोफणे डी. एन यांनी प्रास्ताविक केले.विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री के. डी. पवार सर, न्यू इंग्लिश स्कूल जाखणगांवचे, मुख्याध्यापक आर. एन.जाधव, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. धनश्री पोतदार,श्री मोहनराव गुरव यांनी मनोगते व्यक्त केली. श्री ए. के. वळवी यांनी आभार मानले. श्री बी. एस. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

 कार्यक्रमास संस्था सचिव श्री मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,विश्वस्त श्री योगेशराव देशमुख, श्री. एस. आर.पाटील  सर,  श्री. के. डी. पवार सर,सदस्य श्री जयंतराव जाधव,सौ. नीलम खटावकर,सौ. माया पाटील, सौ. स्नेहल जाधव,श्री कुचेकर जे. पी. प्रा. जे. बी. जाधव तसेच विविध शाखांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.