बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रहाटणी ता . खटाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरीतील सुमेध उमेश थोरात आणि ईश्वरी संतोष थोरात या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले.सुमेध उमेश थोरात इयत्ता दुसरी NSSE परीक्षेत 170/200 गुण मिळवून राज्यात 16 वा क्रमांक मिळवला.मंथन परीक्षा. 128/150 गुण मिळवून
राज्यात 12 वा,जिल्ह्यात 2रा क्रमांक मिळवला अक्षरगंगा परीक्षा 142/ 150 राज्यात 5 वा क्रमांक, अभिरूप परीक्षा 134/150 जिल्ह्यात 4था ,I Am Winner परीक्षा 128/150 तालुक्यात 3 रा क्रमांक मिळवला BDS. परीक्षेत 89/100 मिळवत ब्राँझ मेडल मिळवले तसेच ईश्वरी संतोष थोरात इयत्ता दुसरी हिने अभिरूप परीक्षा 94 /150 केंद्रात 11 वा क्रमांक मिळवला व NSSE परीक्षा 110/ 200 केंद्रात 12 वा क्रमांक मिळविला .
त्यांना वर्गशिक्षिका सौ आराधना गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. रहाटणी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीउत्तम माने , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षश्री देविदास थोरात,, गावचे सरपंचश्री अनिल बुवा यांनी त्याचे अभिनंदन केले






Social Plugin