कास्ट्राईब भीमजन्मोत्सव सोहळा २०२६ तर्फे दिला जाणारा प्रेरणा स्तंभ पुरस्कार जि. प. प्रा. शा. कटचिंचोली येथील शिक्षक श्री. विशाल प्रकाशराव हुलजुते यांना जाहीर ..
मारोती गाडगे प्रतिनिधी/गेवराई
गेवराई (बीड):-गेवराई तालुका कास्ट्राईब भिम जन्मोत्सव सोहळा २०२६तर्फे दिला जाणारा 'प्रेरणा स्तंभ 'पुरस्कार जि प प्रा शाळा कटचिंचोली येथील शाळेचे शिक्षक श्री. विशाल प्रकाशराव हुलजुते यांना जाहीर झाला आहे.
गेवराई येथील पंचायत समिती येथे भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती जन्म उत्साहसोहळा पार पडला या वेळी कटचिंचोली शाळेचे शिक्षक श्री विशाल प्रकाशराव हुलजुते सर यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथे विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, जि प प्रा शाळा कटचिंचोली येथे गावातील नागरिक उपस्थित होते
ग्रामपंचायत कार्यालय कटचिंचोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी गावचे सरपंच उपसरपंच व तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नालंदा बौद्ध विहार कटचिंचोली येथे ध्वजा रोहन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले केक कापुन जन्म उत्साव साजरा करण्यात आला. विवीध महिलांनी भाषणं केली.
सौ. सुषमा मारोती गाडगे यांनी व ग्रामपंचायत सदस्य सौ. पुजा सुनिल अंगरखे यांनी पन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषणं केली.
विशेष कटचिंचोली या गावात सर्वांत प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात करणारे, कटचिंचोली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणारे समाजसुधारक 'एकता ग्रुप ' संस्थापक अध्यक्ष , मराठा योध्दा सकल मराठा सेवा परिवारांचे सदस्य श्री. संदिप (नाना) खोटे कटचिंचोली येथे जि प प्रा शाळेत उपस्थित होते.
शाळेच्या वतीने, श्री संदीप (नाना) खोटे यांचा सत्कार. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री मारोती सर्जेराव गाडगे व शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कटचिंचोली येथील विविध ठिकाणी जयंतीला उपस्थित, गावचे सरपंच श्री रविंद्र निवारे, उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार, श्री विशाल सर, शाळेचे शालेय शिक्षण समिती , उप अध्यक्ष श्री मधुकर औटी, ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील अंगरखे, श्री सुधाकर पवार, श्री असमान कोकणे, श्री रामजी सोनवणे, श्री बाबासाहेब भुत्कर, प्रभु अंगरखे, अर्जुन अंगरखे, चिमाजी खापरे, मोहन भुत्कर, श्री गोरख पर्हाड , श्री अमोल येवले, श्री गणेश कुचे शामराव खरात, (आर पी आय रेवकी गण प्रमुख)- श्री सुनील भुत्कर, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना, पॅंथर सेना गेवराई तालुका अध्यक्ष व पत्रकार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री मारोती सर्जेराव गाडगे यांनी सर्व कार्यक्रमाला उपस्थितिती लावली.





Social Plugin