Ticker

6/recent/ticker-posts

पाटण बस स्थानका समोरील दोनशे वर्षांपूर्वीचा ब्रिटिश कालीन धांडेपूल आज अखेर पाडण्यात आला



पाटण (दिनकर वाईकर) 

पाटण बस स्थानकासमोरील बहुचर्चित 200 वर्षांपूर्वीचा ब्रिटिश कालीन धांडे पूल नवीन पुनर्बांधणीसाठी अखेर पाडला गेला विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग इ 166 साठी पाटण येथे रस्त्याचे काम सुरू झाले आहे पाटण शहरातील रस्त्याचे व पुलाचे काम हे किमान दोन महिने चालेल असे सांगण्यात येत आहे या कालावधीत या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदी सूचनाद्वारे सांगण्यात आले कराड–चिपळूण या महत्त्वाच्या महामार्गावरील पाटण शहरातील केरा पुल ते रामापूर या दरम्यान सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून, याच पार्श्वभूमीवर या मार्गावरील धांडे पुलाची रुंदी व उंची वाढविणे अत्यावश्यक झाले होते. परिणामी, ब्रिटिशकालीन धांडे पुल आज बुधवारी सकाळी दहा  वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला.

          पाटण शहरातील वाहतुक मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.

१. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळुण कडे जाणारी अवजड वाहतुक :-

 कराड व उंब्रज येथुन सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन पाचवंड फाटा उंडाळे

कोकरुड मलकापुर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळुन कडे जाईल.

२. चिपळुन कड्न कराड व उंब्रज कडे येणारी अवजड वाहतुक :-

चिपळुन वरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापुर कोकरूड उंडाळे पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन कराड, उंब्रज कडे जाईल.

३. कराड व उंब्रज बाजुकडून चिपळूण कडे जाणारी सर्व हलकी वाहतुक :-

कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथुन कराड ते चिपळुन महार्गावरुन चिपळुन कडे जातील.

४. चिपळूण बाजुकडुन कराड उंब्रज कडे येणारी सर्व हलकी वाहतुक :-

 चिपळुन कडुन येणारी वाहतुक नेरळे गौंड गव्हाणवाडी फाटा नेवारस्ता मार्गे कराड व उंब्रज कडे जातील.

तरी वरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे. असे अधिसुचनेत म्हणले आहे.

छाया- दिनकर वाईकर