Ticker

6/recent/ticker-posts

*विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या मध्यस्थीने कृषी विभागाच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी----

 

कृषीमंत्र्यांकडून लवकरच निधी वितरणाचे दिले आश्वासन 

गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

 माननीय विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांना शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी कृषी विभागाकडून मिळणाऱ्या प्रलंबित अनुदानाबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत मा.आमदार भावनाताई गवळी थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी कृषी मंत्र्यांनी प्रलंबित अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अनुदान मागील बऱ्याच काळापासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. ही बाब लक्षात घेऊन, कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी आमदार भावनाताई गवळी यांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

आमदारांची तत्परता, कृषीमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

तालुका प्रमुखांनी निवेदन दिल्यानंतर आमदारांनी क्षणाचाही विलंब न करता थेट कृषी मंत्र्यांना फोन लावला. प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मांडून शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. आमदारांनी केलेल्या मागणीची दखल घेत, कृषी मंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करून प्रलंबित अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

आमदारांच्या या तत्परतेमुळे आणि तालुका प्रमुखांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रलंबित अनुदानाचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आमदारांचे आभार मानले जात आहेत. लवकरच अनुदान जमा होईल, अशी खात्री शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे यांनी दिली आहे.