Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यातील ताड शिवणी गावातील रात्रंदिवस रात्र दिवस रेती उखाणामुळे रस्त्याची चाळण महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

  





महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी 

महेंद्र खरात दि. 12. 04. 2026

सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावामधून रात्रंदिवस रेती उत्खनामुळे रस्त्याची चाळण झाली आहे महसूल विभागातील स्थानिक अधिकाऱ्याला फोन केला असता स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे उडवापूर्वीचे उत्तरे कुठेतरी पाणी मुरतंय तात्काळ सिंदखेड राजा स्थानिक तहसीलदार साहेबांनी व विभागीय अधिकारी खडसे साहेबांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची झालेली दुरावस्थेची तात्काळ पंचनामा करून रस्त्याचे दुरुस्तीचे काम करावे आणि अवैधरित्या वाळू तस्करांना आवर घालावा अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे सदर प्रकरणाचा स्थानिक महसूल अधकारी यांना फोन केला असता रेतीवाल्यांना मी थांबू शकत नाही मी काय मार खाऊ का  प्रशासनाने त्यांना महसूल विभागांमध्ये त्यांचे काय काम आहे त्यांच्याकडे काय अधिकार आहे यांची जाणीव करून द्यावी आणि तात्काळ ताड शिवणी पासून तीन किलोमीटर अंतरावर देवखेड या गावी घाट असून त्यांचा जाण्याचा मार्ग हा रूम्हा जांभोरा मार्गे आहे बऱ्याचश्या गाड्या बिना रॉयल्टीच्या  आणि ताड शिवणी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चेक पोस्ट नेमून बिना रॉयल्टीच्या येणाऱ्या गाड्यांची तपासणी करावी व तशा गाड्या आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी  आणि जो रस्ता वहरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली त्याची तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्तीचे काम करून द्यावे अशी विनंती गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे