प्रतिनिधी निंबी
निंबी ता बाळापूर येथील अप्रोच रोडचे डांबरीकरण सुरू झाले असून निंबी ते निंबीफाटा पर्यन्त रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती दररोज जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवासी ह्याना खुप जिकिरीचे होउन गरोदर महिला व रुग्ण हयांना नेण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता
असे असताना गावातील अनिकेत चांदणे ह्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व शासन प्रशासन ह्यांना निवेदन व विनंती करीत रोडचे डांबरीकरण व कामकरणे साठी विनंती केली. या रस्त्याचे काम गेली दहा वर्षापूर्वी अकोला जिल्हा परिषद विविध योजनेतून झाले होते तेव्हा पासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे रस्त्याची पार चाळण होऊन गेली होती व आहे ज्यांचे कडे साधी मोटरसायकल नाही किंवा कोणत्याही प्रकारचे वाहन तरी गावातील नागरिक व महिला साठी जास्तीत जास्त मेहनत घेऊन अनिकेत चांदणे ह्यांनी निवेदन देण्यात कमी केले नाही
असे असताना स्थानिक जिल्हा व तालुक्यातील लोक प्रतिनिधी ह्यांनी लक्ष घालून निंबी ते निंबीफाटा या रोडचे कामा साठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ४२.५० रुपये मंजुर केला ८२० मिटर लांबी एवढा डांबरीकरण रोड आजमितीस सुरू झाले आहे व त्यामुळे निंबी येथील विद्यार्थी व प्रवासी वाहनधारक सर्वानी सर्वाचे आभार व्यक्त केले आहेत
.jpg)




Social Plugin