Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर येथील करण ब्राम्हणवाडे यांचे पोलीस दलात यश



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील करण सुनिलराव ब्राम्हणवाडे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीत यश संपादन केले आहे. शेती पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येणाऱ्या करण यांनी B.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण करून दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण तयारीनंतर हे यश मिळवले.

पोलीस दलात जाण्याची प्रेरणा त्यांना मित्रपरिवार आणि आई-वडिलांकडून मिळाली. तयारी करताना पुस्तकांची कमतरता ही मोठी अडचण होती, मात्र मित्रांकडून पुस्तके उधार घेऊन त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. दररोज ९ ते १० तास अभ्यास आणि स्वतःच्या जोरावर शारीरिक तयारी करून त्यांनी हे स्वप्न साकार केले.

करण यांच्या यशामागे आई-वडिलांचा मोठा वाटा असून, निवड झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागातील मुलींना संदेश देताना करण म्हणाले की, “मुलींनी आत्मविश्वास वाढवून स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे. लेखी परीक्षा आणि शारीरिक तयारी या दोन्ही गोष्टींवर समान लक्ष देणे आवश्यक आहे.”

पुढील काळात वरिष्ठ पदासाठी अधिक अभ्यास करून मोठे पद मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. तरुणांना संदेश देताना त्यांनी “मेहनत करा आणि आपले स्वप्न पूर्ण करा” असे आवाहन केले.