छाया - प्रकाश राजेघाटगे बुध .केशवराव पाटील सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील देशमुख
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव येथील केशवराव पाटील विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील देशमुख, तर उपाध्यक्षपदी रेखा माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी माजी अध्यक्ष इंदिरा घार्गे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सहकारमहर्षी केशवराव पाटील यांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित काम करत सभासद व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचेही त्यांनी सुचविले.
या प्रसंगी मावळते अध्यक्ष श्रीरंग इंगळे, उपाध्यक्ष किरण बोबडे, संचालक दादा मोहिते, गणेश देशमुख, अस्लम पठाण, अनिल कुदळे, मोहन पाटोळे, सचिव सूरज पवार, अमर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील माळी यांनी काम पाहिले.
.jpg)




Social Plugin