Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे लवकरात लवकर पंचनामे करावेत..... रविंद्र राजदेव






पारनेर प्रतिनिधी 

         अचानक चक्री वादळ आणि अवकाळी पावसाने वारनवाडी येथे हांडे वाडा वस्तीवर घरांचे ,विजेच्या पोलचे आणि शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आणि शेतकर्याला उगड्यावर आणले.

          अक्षरशः आदिवासी वस्तीवर छप्परची चार पाच घरे वाऱ्याने उडून गेली ,त्या आदिवासी बांधवांचा प्रपंच सगळा वाऱ्याने उडून जाऊन ,घरात पाणी घुसून धान्याचे आणि कपड्याचे तसेच वापरायला असणाऱ्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

         शेतकऱ्यांची टोमॅटो ,आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , काल पासून ह्या भागात विजेचे पोल पडल्यामुळे लाईट नाही ,तरी लवकरात लवकर पडलेले पोल दूरस्थ करून लाईट सोडण्यात यावी अशी मागणी टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी केली आहे.

        यावेळी तुकाराम कारंडे ,दिलीप डोमाळे ,खंडू डो माळे, नाथा मारुती हांडे ,सुनिल डोमाळे,कैलास पवार ,दत्तात्रय काळे ,प्रकाश हांडे ,लक्ष्मण कारंडे,भाऊ कारंडे ,शिवाजी केदार ,बाळू वाघ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.