ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका श्रीमती गंगासागर विश्वनाथ मॅनेवार(रा.मुखेड) हे नियत वयोमानानुसार मंगळवार दि.३१ मार्च रोजी तब्बल ३८ वर्ष सेवा देत अखेर सेवानिवृत्त झाल्या आहेत.मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मान्यवर अधिकाऱ्यांच्या वतीने यथोचित कपडेरूपी आहेर भेट देऊन सत्कार करीत शुभेच्छां देण्यात आल्या.
येथील आरोग्य सेविका मॅनेवार या खतगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ वर्षांपासून कार्यरत होत्या.दि.३० जानेवारी १९८८ साली कुरूळा,ता.कंधार केंद्रात आरोग्य सेविका म्हणून नियुक्ती झाली.त्यानंतर सावरगांव, ता.मुखेड,इवळेश्वर, ता.माहूर येथेही त्यांनी सेवा दिलेली होती.आपल्या सेवाकाळात त्यांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार विविध रूग्णांना वेळोवेळी सेवा दिली आहे.संवादी आणि हजरजबाबी या गुणांमुळे कर्मचारीवर्ग व महिला रूग्णांना आपलेसे करण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत.गरजू,समस्याग्रस्त रुग्णांची सेवा करण्यात त्या नेहमी अग्रेसर असत.सेवानिवृत्त गौरव सोहळ्यात त्या भावूकपणे आपल्या दीर्घ संवेदनांना हळूवार मांडत सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रम अध्यक्षा म्हणून खतगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.निता भावठाणकर,प्रमुख अतिथी केंद्रातील डाॅ.वैभव रामपुरे,औषध निर्माण अधिकारी लक्ष्मण अनपलवार, कर्मचारी मारोती पेंटे सह प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील उपकेंद्रातील कर्मचारीवर्ग,प्रतिष्ठित नागरिक यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.





Social Plugin