Ticker

6/recent/ticker-posts

"आदर्श शाळा धोत्रा भनगोजी गावाचे नाव विद्यार्थ्यांनी उंचावले. "ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची तंत्रज्ञानात गगनभरारी"




मन्सूर शहा धोत्रा भनगोजी 

प्रतिनिधी चिखली,:--

प्राप्त माहितीनुसार,"ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची तंत्रज्ञानात गगनभरारी " मौजे, धोत्रा भंनगोजी    CS HACKATHON मध्ये जि प मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या १)अनुष्का समाधान रिंढे २)साक्षी सतिष काळे या विध्यार्थिनीचे दमदार सादरीकरण व श्रीअनिल केसकर सर यांच्या मार्गदर्शनतून जिल्ह्यातून चौथा क्रमांक मिळवत सहभागी विध्यार्थ्यांना दोन व शाळेसाठी दोन एकूण 4 लॅपटॉप पटकविले.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा मा. श्री गुलाबरावजी खरात साहेब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारले बक्षीस. त्यांचे हे यश   शाळेतील इतर विध्यर्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. शाळेत संस्कार, ज्ञान, विज्ञान, आणि तंत्रज्ञान यांचे उत्कृष्ट शिक्षण मिळत आहे. आज यशस्वी विध्यार्थिनी त्यांचे पालक,मुख्याध्यापक, शिक्षक यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व गावाकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा जंजाळ मॅडम यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री वासुदेव जी महाले सर यांनी मार्गदर्शन देऊन शुभेच्छा दिल्या, विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, त्यानंतर श्री विवेक पवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यावेळी,सरपंच श्री गुलाबसिंग सोनारे, शाळा समिती अध्यक्षा सौ. उमाताई विवेक पवळ, श्री कैलास काळे, सतिष काळे,समाधान रिंढे, विलास काळे,पालक वर्ग तथा गावकरी मंडळी, विद्यार्थी हजर होते.