बिलोली प्रतिनिधी ~ आमेटवार राजेश
बिलोली : देशात चालू असलेल्या सद्यास्तिथीला गॅस पुरवठा तुटवढ्यामुळे आज दि. ०२/०४/२०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कडे वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब व उत्तर जिल्हाध्यक्ष राज आटकोरे साहेब यांच्या नेतृत्वात आज एलपीजी गॅस च्या तुटवड्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले.सध्या चालू असलेल्या जगातील युद्ध परिस्थितीमुळे भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅसचा साठा कमी असून याचे, परिणाम संपूर्ण महाराष्ट्र व भारतात पडत आहेत, यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅस हे नागरिकांना मिळत नसून गॅस एजन्सी समोर मोठमोठ्या रांगा लागत आहेत.यामध्ये अनेक व्यवसायिक व कामगार आणि शेतकरी व सामान्य माणूस गॅस मिळत नसल्यामुळे आपले स्वतःचे कामे सोडून गॅस एजन्सी समोर मोठ्या रांगा लावून उभा टाकत आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेस वेटीस धरून गॅस एजन्सी मार्फत काळाबाजार मनमानी दरामध्ये अवैध्यरित्या विक्री करून जनतेची आर्थिक, मानसिक,लूट करण्याचा प्रकार दिसून येत आहे.व यातच सीएनजी सारख्या ऑटो व गाडी मोटर गाडी साठी लागणारा गॅस सुद्धा मिळत नसल्यामुळे ऑटो चालकांना उपासमारीची वेळ आलेली आहे.गॅस मिळण्यासाठी महिला भगिनींना तासनतास रांगेत उभे राहून दिवसभर होत असलेला त्रास व यातच रांगेत उभे राहून महाराष्ट्रा त एका नागरिकाचा जीव सुद्धा गमावला लागला आहे,अशा गंभीर स्वरूपाच्या घटनेत वाढ होत आहे एकीकडे देशाचे प्रधानमंत्री सांगत आहेत की देशात एलपीजी गॅस चा साठा मोठ्या प्रमाणात आहे मग हा पुरवठा कमी का पडतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.तरी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन व उत्तर जिल्हाध्यक्ष राज आटकोरे यांनी जिल्हाधिकारी राहुल कार्डिले साहेबाना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे की एलपीजी गॅस साठा सुरळीत करून अवैधरीत्या व जादा दराने विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी वरती कायदेशीर कारवाई ताबडतोब करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी नांदेड च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दक्षिण रवी पंडित, जिल्हा महासचिव उत्तर दीपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके,कायदेशीर सल्लागार अँड जयपाल ढवळे, विनोद वाघमारे,अरुण भद्रे, जिल्हा सचिव रंगनाथ गजले,बालाजी सावंत, रामराव ढवळे, विद्यानंद पोवळे, प्रकाश कोल्हे,व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण कार्यकारणी, व उत्तर कार्यकारणी,व कार्यकर्ते उपस्थित होते .
.jpg)




Social Plugin